२५,००० हून अधिक विद्यार्थ्यांना डिजिटल साक्षरतेचे प्रशिक्षण दिले आहे
संस्थापक
ड्रिम फ्युचर फाऊंडेशन
अध्यक्ष
ड्रिम फ्युचर फाऊंडेशन
“फक्त स्वप्नं पाहू नका, ती साकार करण्याची जबाबदारी घ्या — आम्ही आहोत तुमच्यासोबत!”
ड्रिम फ्युचर फाऊंडेशन ही एक सामाजिक, शैक्षणिक आणि कौशल्यविकास क्षेत्रात कार्यरत प्रेरणादायी संस्था आहे. या फाऊंडेशनची स्थापना २०२२ साली समाजातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत शिक्षण, डिजिटल साक्षरता आणि रोजगाराच्या संधी पोहोचविण्याच्या ध्येयाने करण्यात आली.
संस्थेचा मुख्य पाया — ड्रिम फ्युचर स्किल डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूट प्रा. लि. (स्थापना २०१६) या अनुभवी आणि यशस्वी संस्थेने घातला आहे, ज्यामुळे या फाऊंडेशनला अनुभव, विश्वास आणि कार्यक्षमतेचे मजबूत पायाभरणी मिळाली आहे.
आणि, “ड्रिम फ्युचर फाऊंडेशन” हे नाव म्हणजे — स्वप्नांना आकार देणारी चळवळ, शिक्षणातून परिवर्तन घडवणारी शक्ती आणि यवुशक्तीला दिशा देणारा विश्वास.
“एक असा भारत घडवूया — जिथे प्रत्येक डोळ्यात स्वप्न असेल, प्रत्येक हातात कौशल्य असेल, आणि प्रत्येक मनात राष्ट्रनिष्ठेची ज्वाला पेटलेली असेल!”
आमचं स्वप्न आहे — एक असा नवा भारत, जिथे ज्ञान हे शक्तीचं शस्त्र असेल, कौशल्य हे आत्मनिर्भरतेचं कवच असेल, आणि तंत्रज्ञान हे प्रगतीचं पंख असेल.
"आम्ही असा समाज उभारू इच्छितो, जिथे शिक्षण हे केवळ रोजगाराचं साधन नसून, जीवन बदलण्याचं माध्यम असेल."
जिथे प्रत्येक गाव डिजिटलदृष्ट्या सक्षम असेल, आणि प्रत्येक तरुणाला आपल्या स्वप्नाचं गंतव्य गाठण्याची ताकद मिळेल.
जिथे प्रत्येक स्त्री उद्योजकतेचं प्रतीक असेल, आणि प्रत्येक कुटुंब ज्ञानाच्या दिव्याने उजळलेलं असेल.
आमचा दृष्टिकोन म्हणजे — स्वप्नांना उड्डाण देणारा भारत, शिक्षणातून सशक्त होणारा भारत, कौशल्यातून प्रगत होणारा भारत, आणि तंत्रज्ञानातून जगाचे नेतृत्व करणारा भारत!
“कौशल्य, शिक्षण आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आत्मनिर्भर भारताची निर्मिती.”
आमचं ध्येय केवळ प्रशिक्षण देणं नाही, तर प्रत्येक तरुणामध्ये सुप्त असलेली क्षमता जागृत करणं आणि त्याला स्वतःचं भविष्य घडविण्याची ताकद देणं आहे.
“आम्ही प्रत्येक घरात ज्ञानाचा दिवा पेटवू, प्रत्येक हातात कौशल्य देऊ, आणि प्रत्येक मनात परिवर्तनाची ज्योत प्रज्वलित करू.”
आम्ही विश्वास ठेवतो की बदल पुस्तकांतून नाही, तर ज्ञानाच्या कृतीतून घडतो. त्या दृष्टीने, ड्रिम फ्युचर फाउंडेशन ही फक्त एक शैक्षणिक संस्था नसून, ती एक अशी चळवळ आहे जी शिक्षणातून परिवर्तन, कौशल्यातून प्रगती आणि तंत्रज्ञानातून आत्मनिर्भरता घडवते.
१०+ वर्षांचा यशस्वी अनुभव
२५,००० हून अधिक विद्यार्थ्यांना डिजिटल साक्षरतेचे प्रशिक्षण दिले आहे
१०० पेक्षा अधिक प्रशिक्षण केंद्रांद्वारे शैक्षणिक उपक्रम राबविले आहेत,
५००० पेक्षा जास्त युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत
डिजिटल साक्षरता – समाज परिवर्तनाची गुरुकिल्ली
संस्था भारत सरकारच्या Digital India आणि प्रधानमंत्री ग्रामीण डिजिटल साक्षरता अभियान यांसारख्या उपक्रमांना बळ देत आहे. आम्ही प्रत्येक गाव, प्रत्येक शाळा आणि प्रत्येक नागरिकापर्यंत डिजिटल शिक्षणाचा प्रकाश पोहोचविण्याचे कार्य करीत आहोत.
आमचे स्वप्न — “डिजिटल साक्षर भारत, आत्मनिर्भर भारत!”
सहभागी व्हा!”
आज अनेक तरुण-तरुणी शिक्षित आहेत, पण योग्य संधींच्या प्रतीक्षेत आहेत. ड्रिम फ्युचर फाऊंडेशन त्यांच्यासाठी “संधीचं व्यासपीठ” बनलं आहे.
संस्थेने Skill India, Digital Employment Mission यांसारख्या उपक्रमांद्वारे तरुणांना प्रशिक्षण आणि रोजगार मिळवून दिला आहे.
कौशल्य हेच भविष्य आहे, आणि आम्ही ते भविष्य प्रत्येक हातात देण्यास कटिबद्ध आहोत.